Latest News

6/recent/ticker-posts

प्रभुराज प्रतिष्ठाण,लातूर च्या वतीने गणरायाच्या वेशभूषेत जनजागृती    

प्रभुराज प्रतिष्ठाण,लातूर च्या वतीने गणरायाच्या वेशभूषेत जनजागृती  



लातूर:(प्रतिनिधी) दि. २१ - रोजी फिजिकल डिस्टन्स चे पालन करत दयानंद गेट व संभाजी नगर परिसरात कोरोना बाबत जनजागृती करण्यात आले. जिल्हाअधिकारी यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकारी सोबत बैठक घेऊन गणेशत्सव साजरी करण्यास कांही नियम व अटी लादण्यात आले. त्या नियमाचे पालन जिल्ह्यातील प्रत्येक मंडळांनी पाळून सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यात जास्तीत जास्त हा सण घरच्या घरी साजरा करावा ज्याने मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होणार नाही त्यात होणारा संसर्ग ही टाळता येईल. हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पण सद्या परिस्थिती ही कोरोनामुळे बदलेली आहे. या रोगाला हरवायचे असेल तर नागरिकांनी जास्तीत जास्तच लोकांशी संपर्क टाळावा आणि प्रशासनाचे नियमाचे पालन करावे हे आपल्या व परिवाराच्या हिताचे आहे. विनाकारण गर्दी करून नागरिकांनी जीव धोक्यात टाकू नये या भयंकर रोगाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे गरजेच आहे.नागरिकांनी सणाच्या काळात घराबाहेर पडून विनाकारण गर्दी करू नये घरातच राहून हा मोठा सण मोठ्या उत्साहात साजरा करावा. हे आपल्या सहकार्याने शक्य होईल त्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.असे प्रशासनाने अवाहान केले होते.त्यात बाजारपेठेत कांही नागरिकानी प्रशासनाने लादून दिलेल्या अटी कडे गांभीर्य दिसत नाही.त्यात नागरिकांत जनजागृती तसेच नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रतिष्ठाण ने गणेश बाप्पा चा बेशभूषा परिधान करून घरी राहा...सुरक्षित राहा.. प्रशासनाचे नियम पाळू.... आरोग्याची काळजी घेऊ...सुरक्षित अंतर ठेवूया... असे बोलके फलक हातात घेऊन नागरिकांत जानजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.यावेळी प्रभुराज प्रतिष्ठाण व मनसे चे अँड.अजय कलशेट्टी,गोविंद कांबळे,राजकुमार जगताप,पाडुरंग बेंबडे,अनिल कोतवाड,विष्णू गुरुडे,सचिन भोसले,माहादेव रासे,सुनील शिंदे,साईनाथ रासे,दीपक सगर,दगडू लोमटे,योगेश गायकवाड,अक्षय जाधव आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments