माहेश्वरी पाटील चाकुरकर यांची अखिल भारतीय मराठी चिञपट महामंडळ महिला ब्रिगेड महाराष्ट्र सदस्य म्हणून निवड
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) मागील कांही दिवसांनी पुर्वी माहेश्वरी पाटील चाकुरकर यांची चिञपट संघटनेच्या प्रदेशाध्यक्षापदी निवड झाली होती.नुकतीच त्यांची अखिल भारतीय मराठी चिञपट महामंडळ महिला ब्रिगेड महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य म्हणून निवड झाली आहे.
चिञपट सृष्टी मध्ये त्यांनी जे यश मिळवले आहे ते अत्यंत खरतर व समस्यांनी व्यापलेला होता.एका सर्वसामान्य कुटुंबातीत जन्म घ्यावा आणि राष्ट्रीय पातळी पर्यंत आपला नावलौकिक करावा ही बाब सामान्य नव्हतीच त्यांना कथा कांदबरी लिहण्यांचा छंद होता.मराठी चिञपटासाठी त्यांना कथा लेखन केला.फास चिञपटांची कथा त्यांनी लिहली हि कथा वास्ववादी चिञ दाखवणारी होती.शेतकरी कर्जाला कंटाळुन आत्माहत्या करतो.त्यांच्या मृतदेह झाडावर लटकलेला असतो.त्यांचा परिवार त्याला खाली काढण्यासाठी प्रतीक्षा करीत असतो.पोलीस पंचनामा सुरु करतात त्या कुटुंबाला होणारा ञास किती वेदनादाई असतो.यांचे बोलके कथानक त्यांनी लिहले.
फासा चिञपटांचे कांही चिञण त्यांनी चाकुर शहरात व परिसरात केला होता.त्यावेळेस संपूर्ण शहर चिञपटमय झाले होते.चाकुर शहारांतील कांही भागात चिञपटातील चिञन गीत,वाढदिवसांचे दृष्य,दवाखान्यात मृतदेहांचा पंचनामा,शेतकरी आत्माहत्याचे मार्मिक चिञण चाकुर शहरांत करुन रसिकांनी यांचा मनसोक्त आनंद घेतला.
शेतकरी आत्महत्यांचे कथानक लिहुण त्यांनी एक अनोखी कथा मांडुन समाजातील वास्ववादी चिञ रेखाटले आहे.
अशा अनेक कथा कांदबरी लिहुण त्यांनी आपले नावलौकिक केले आहे.महिला असुन एवढ्या मोठ्या पदावर विराजमान होणे ही गोष्ट सोपी नाहीच.त्यांचे जेवढे कौतुक करावे ते कमीच आहे.
अखिल भारतीय मराठी चिञपट महामंडळ महिला महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य पदी निवडी करण्यात आली.यावेळी अखिल भारतीय मराठी चिञपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले,नवनिर्वाचित सल्लागार शहाजीराव एस.पाटील,निवृत्त पोलीस उपायुक्त आदि उपस्थित होते.सौ.माहेश्वरी पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.चिञपट सृष्टीतील नामवंत कलाकार,दिग्दर्शक,राजकीय,सामाजिक,क्षेत्रातील व्यक्तीनी शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसही प्रोत्साहन केले.
0 Comments