गंगापुर ग्रामपपंचायतचा बहुउपयोगी उपक्रम
एक पाऊल स्वच्छतेकडे... ट्रॅक्टर, ट्राॅली व टॅंकर खरेदी
लातूर:(प्रतिनिधी) आज गंगापुर ग्रामपंचायत ने महिन्द्रा अर्जुन ५५५ या ट्रॅक्टरची खरेदी केली, त्यासोबत ट्राॅली व टॅंकर पण खरेदी केला आहे. ग्रामपंचायतीने एक पाऊल स्वच्छता व कचरामुक्ती कडे टाकले असुन प्रत्येक घरोघरी जाऊन ट्रॅक्टर व ट्राॅली ने कचरा गोळा करणार आहे. घंटागाडी म्हणुन याचा उपयोग होणारं आहे. तसेच ट्रॅक्टर व टॅंकर च्या मदतीने उन्हाळ्या मध्ये पाणीटंचाई पाणी शुध्दीकरण केन्द्र (पाणी फिल्टर) ला ही पाणीपुरवठा नियमितपणे होणारं आहे. वृक्षलागवडी साठी ही याचा उपयोग होणारं उन्हाळ्यामध्ये झांडाना पाणी देता येणार आहे. सदर ट्रॅक्टर, ट्राॅली व टॅंकर खरेदी ची गावास आवश्यकता होती व वाढत्या लोकसंख्येनुसार कचरामुक्ती ची गरज पुर्णत्वाकडे जात आहे असे सरपंच बाबु खंदाडे यांनी "मराठी अस्मितेचा इशारा" च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
0 Comments