Latest News

6/recent/ticker-posts

निलंग्यात 'वंचित' चे डफली बजाव आंदोलन यशस्वी

निलंग्यात 'वंचित' चे डफली बजाव आंदोलन यशस्वी



निलंगा: दि.१२ (मिलिंद कांबळे) केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत,याचा निषेध म्हणून वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी शाखा निलंगा च्या वतीने निलंगा येथे दि. १२ रोजी डफली वाजवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तो यशस्वी रित्या पार पडला.वंचितचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी यांच्या नेतृत्वात सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात आले.राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी निलंगा येथील बस डेपो समोर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील बाजार समिती, व्यापारी,रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार इ.संघटना आंदोलनात सामील झाल्या होत्या. या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व सांगण्यात आले. शिवाय लॉकडाऊनला विरोध का आहे ? हे ही समजावून सांगण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजयकुमार सूर्यवंशी,देवदत्त सूर्यवंशी,प्रदीप सोनकांबळे,अर्जुनाप्पा कटके,प्रदीप सोनकांबळे,बालाजी कांबळे,बालाजी कांबळे(टेलर),अंकुश गायकवाड,अंकुश कांबळे,अर्जुन कांबळे,मनोज कांबळे,शेख इमरान, गायकवाड आकाश,कांबळे अनोज,सूर्यवंशी अजय बनसोडे चंद्रगुप्त, घोरपडे अशोक,शिंदे नागनाथ क्षितिज कांबळे, किरण कांबळे, बस्वराज सोनकांबळे, गोपाळ शिंदे, कृष्णा जाधव, विठ्ठलराव गायकवाड, दीपक सोनकांबळे, गोपाळ सूर्यवंशी, दिलीप गायकवाड, उत्तम सूर्यवंशी, समाधान कांबळे, विनोद कांबळे,इत्यादिनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments