अशोकराव पाटील निलंगेकर यांच्याकडून शेख कुटुंबीयांचे सांत्वन
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील मुगाव येथील अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हा सचिव मोहम्मद चांदसाब शेख यांचे वडील चाँदसहाब मक्दुमसाब शेख यांचे काही दिवसापूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्या कुटुंबीयांची सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी कमिटी सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी आठ जानेवारी रोजी येथील कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्या कुटुंबीयांची सांत्वन करत त्यांच्या दुःखात सहभागी झाले यावेळी सुरेंद्र धुमाळ , सिराज देशमुख अंकुश वाडीकर, गणेश महाळ ,चांदसाब सय्यद,शहाकानी देशमुख, गोविंद वटेंकर, विठ्ठल रक्ताटे श्रीमंत तरंगे, राज बब्बर मुजावर व कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
0 Comments