Latest News

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात कोंबड्यावर आली संक्रात;केंद्रेवाडीत जिल्हाधिकारीनी केला पाच किमी अलर्ट झोन जा

जिल्ह्यात कोंबड्यावर आली संक्रात;केंद्रेवाडीत जिल्हाधिकारीनी केला पाच किमी अलर्ट झोन जारी 

लातूर:(प्रतिनिधी) राज्यात काही ठिकाणी कोंबड्या व इतर पक्षी अज्ञात अाजाराने मरण पावल्याच्या बातम्या येत असताना काल अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथील एका पोल्ट्री फार्म मधील ३५०  कोंबड्या मेल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी श्री.पृथ्वीराज बीपी यांनी संबंधीत फार्मच्या ५ किमी परिघात अलर्ट झोन जारी केला असून या परिसरातून कोंबड्या,अंडी,खत,पक्षी खाद्य, साहित्य, उपकरणे,व वाहतुकीवर निर्बंध घातले अाहेत. प्रतिबंधीत परिसरातील खासगी वाहनासाठी काही नियम कडक केले अाहेत.या पोल्ट्री फार्मच्या पाच किमी परिसरात कोंबड्यांची खरेदी विक्री,वाहतुक,यात्रा, बाजार यास बंदी घातली अाहे. पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधला असता केंद्रेवाडीतील त्या पोल्ट्री फार्म मधील अाज अाणखी ४० कोंबड्या मयत झाल्या  तसेच सुकणी येथील एका धाब्यावरील ८० कोंबड्या मरण पावल्या अाहेत. अशी माहिती देण्यात आली. कोंबड्यांचा मृत्यू नेमका कोणत्या अाजाराने झाला या बाबतचा अहवाल मात्र अद्याप प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात अाले.कोंबड्यां मध्ये बर्ड फ्लू पसरल्याच्या भीतीने पोल्ट्री  व्यावसायीकांचे धाबे दणाणले अाहेत.तर या अाजाराने कोंबड्या मरण पावत असल्याच्या बातम्या वाचुन चिकन, अंड्यांची मागणी झपाट्याने कमी झाल्याचे निदर्शनास येत अाहे. माणसांतील कोरोना अाजाराची भीती काहिशी कमी होत असताना पक्षी अज्ञात अाजाराने मरण पावत अाहेत या बातमीने नागरिकांच्या चिंतेत भर पडली अाहे.

Post a Comment

0 Comments