भोसले हॉस्पिटल मध्ये पत्रकाराची रोटरी क्लबच्या वतीने केली तपासणी
लातूर:(प्रतिनिधी) येथील अशोक हॉटेल परिसरात असलेल्या भोसले हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लबच्या वतीने लातूर शहरातील पत्रकारांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली यामध्ये बीपी शुगर तसेच इतर महत्त्वाच्या तपासण्या करण्यात आल्या तपासणीचा रिपोर्ट यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकारांची मोफत तपासणी केल्याबद्दल पत्रकार संघाचे अध्यक्ष रोटरी क्लबचे आभार मानून जिल्हाधिकारी यांचा डायरी लेखणी देऊन गौरव केला.
0 Comments