पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे जनसंवाद व शांतता समितीची बैठक
लातूर : आज दिनांक 09 जून 2025 रोजी दुपारी 11:30 वाजण्याच्या सुमारास नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये जनसंवाद कार्यक्रम व शांतता समितीची बैठकीचे छोटे खाणी आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस लातूर मधील प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक, समाजसेवक, तसेच पत्रकार उपस्थित होते.
सदर जनसंवाद कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, गुन्हेगारी, अवैध धंदे या व इतर विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वसामान्यांना उद्भवणाऱ्या प्रश्नावर चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात शहाजी उमाप यांनी निर्देशित केले.
सदर बैठकीस पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक तेरने मॅडम, यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे व जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी अधिकारी,अमलदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments