Latest News

6/recent/ticker-posts

जागतिक परिचारिका दिना निमित्य अचवला येथे महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा सत्कार

जागतिक परिचारिका दिना निमित्य अचवला येथे महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा सत्कार


देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना मध्ये समाविष्ट असणारी ग्रामपंचायत अचवला येथे जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून गावामधे कार्यरत आशा कार्यकर्ती शोभाताई आनंत सावळे यांचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सत्कार करन्यात आला. यावेळी उपसरपंच नामदेव कारभारी, आनंत सावळे, बालाजी भांजे, ग्रामपंचायत सेवक वसंत लखनगावे ई उपस्थित होते. परिचारिका असा शब्द उच्चारल्याबरोबर रुग्णांची अहोरात्र मेहनत करून सेवा करणारी, रुग्णांना धीर देणारी व त्यांचे मनोबल उंचावणारी, रुग्णाच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनून आरोग्याची काळजी घेणारी स्त्री आपल्यासमोर उभी राहाते. या कोरोनाकाळात (Corona) तर परिचारिका रुग्णांची सेवा करण्यासाठी वेळप्रसंगी स्वतःच्या कुटुंबाला दुर्लक्षित करून सेवा देत आहेत. त्यामुळे परिचारिका (International nurses day) करीत असलेली मानवतेची सेवा नेहमीच आदरास पात्र ठरली आहे. इसवी सन १८५४ मध्ये क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. त्यामुळे दर वर्षी १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा होतो.

Post a Comment

0 Comments