Latest News

6/recent/ticker-posts

जागतिक परिचारिका दिना निमित्य कासार शिरशीत महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

जागतिक परिचारिका दिना निमित्य कासार शिरशीत महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार


कासार शिरशी
:(
प्रतिनिधी/फेरोज जागीरदार) परिचारिका दिनानिमित्त औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनानुसार कासार शिरशीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व परिचारिका सह वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी येथील ज्येष्ठ पत्रकार श्याम मुळजकर हे होते. जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून कोरोना संक्रमणाच्या काळात मातृत्वाच्या भूमिके विशेष योगदान देणाऱ्या परिचारिकांचा कासार सिरसी येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक प्रतिनिधी जिलानी भाई बागवान, धनराज होळकुंदे, महेश गरंडे यांच्या हस्ते डॉ. पाटील, शिंदे, कुलकर्णी यांचेसह परिचारिका शिवकन्या स्वामी, रंजना पांचाळ, सत्वशीला कांबळे, संगीता पोतरे, अरुण जाधव, प्रणाली माने, सुरेखा दिलपे, पूजा गोसावी, टाकळे रजिया यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गिरीश तुळजापुरे, दिलीप माने, कस्तुर जानकर, किरण किवडे आदी कार्यकर्ते हजर होते. आपल्या भाषणात मुळजकर म्हणाले की कोरोना च्या काळात डॉ. परिचारिका यांना सद्गुरु चे स्थान प्राप्त झाले आहे केवळ समर्पित भावनेने आज आरोग्य कर्मचारी रुग्णांची सेवा करीत आहे आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध केल्याने त्यांचा सर्वत्र गौरव होत आहे असे सांगून ते म्हणाले की आजची परिचारिका आम्हाला मुक्ताई समान आहे तिचा होत असलेल्या मुक्त गौरवा बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments