रमजान ईदची नमाज घरातच पठण करुन साजरी करावी- डॉ.शिवानंद बिडवे,तहसिलदार चाकुर
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर तालुक्यात व शहरात कोरोनांचा संसर्ग वाढत आहे. येणाऱ्या रमजान ईद निमित्त तहसिल कार्यालयामध्ये शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वानी मिळुन एकमताने असा निर्णय घेण्यात आला. की,प्रशासनांच्या नियमांप्रमाणे रमजान ईद आपल्या घरीच साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला. मुस्लिम बांधवानी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करुन आपले उपवास धरले व घरातच ईश्वरांची आराधना केली. मज्जिद मध्ये न येता पाचवेळची नमाज घरातच पठण केली. यामुळे शहरातील मुस्लिम बांधवांचे प्रशासनाच्या वतीने तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी अभिनंदन केले. राज्यात कोरोनाचे विषाणूने दुसऱ्या लाटेत राज्यभर थैमान घातले आहे. अश्या परीस्तीतीत ताळे बंदी करण्या शिवाय पर्याय नव्हता त्यामुळे राज्य सरकारने ताळे बंदीचा निर्णय घेतले आसल्याने येत्या में महिन्यात साजरा होणारा रमजान सण घरीच साजरा करावा. तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज बांधवानी रमजान ईद घरीच साजरी करावी असे आवाहन तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी केली आहे. मुस्लिम समाजांचे अत्यंत महत्त्वाचा सण मे महिन्यात होणार आहे. महिनाभर उपास धरुन रमजान ईद अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात येते. पण मागील दोन वर्षापासुन कोरोनाच्या सावटीखाली रमजान ईद येत आहे. दरवर्षी तालुक्यातील शहरात मोठ्या प्रमाणात रमजान ईद साजरी करण्यात येते परंतु गेल्यावर्षी पासून कोरोनाच्या संकटामुळे आपण सर्व समाज बांधवानी रमजान ईद घरीच साजरी करत आहोत. यावर्षी सुद्धा येत्या मे महिन्यात रमजान ईद साजरी होणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून भक्तिमय वातावरणात आपल्या देशावर आलेले कोरोनाचे संकट लवकर संपावे व सर्व धार्मिक कार्यक्रम पुन्हा सुरू करु या आणि या वर्षी आपल्या परीवारासोबत आपण रमजान ईद साजरी करावी. पुढे बोलताना ते म्हणाले कोरोनांचा संकटामुळे सर्व धर्मचे धार्मिक कार्यक्रम घरातच साजरे होत आहेत. यावेळी बैठकीला सय्यद मुर्तुजाअली, शेख हुसेन पप्पुभाई, सलीमभाई तांबोळी, शेख इलियास सर आदि मुस्लिम बांधव उपस्थित होते.

0 Comments