Latest News

6/recent/ticker-posts

आता मिळणार औसेकरांना माकणी चे पाणी;सोशल मीडियावर श्रेयवादाचा कलगीतुरा सुरू

आता मिळणार औसेकरांना माकणी चे पाणी;सोशल मीडियावर श्रेयवादाचा कलगीतुरा सुरू


शेख बी जी

औसा: दि.१२ - औसा शहराला नेहमी पाण्याची कमतरता भासत असते. मागील अनेक वर्षापासून या पाण्याच्या प्रश्नासाठी अनेक नेते मंडळी व समाज सेवक पाण्यासाठी सतत शासना दरबारी मागणी करत आले आहेत. याघडीला सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. मागील वर्षी माकणी धरणातून पाणी आणण्याची योजना मंजूर करण्यात आली होती.या योजनेचे काम जलद गतीने पूर्ण करून जनतेसाठी पाण्याची सोय या उन्हाळ्यात करण्याचा बेत होता. पण काही अडचणीमुळे थोडासा उशीर झाला. उशिरा का होईना मात्र थोड्या कडक उन्हाळ्यात औसेकरांना हे पाणी मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हे पाणी शहराला देण्यात येणार आहे. श्रेयवादाचा सोशल माध्यमांवर कलगीतुरा सुरू. हे सर्व काम मी केले असे नगराध्यक्ष अफसर शेख सोशल मीडियावर सांगत असताना अनेक जण त्यांना हे काम कुण्या एकट्याचे नसून सर्वांच्या मदतीतून, सहकार्यातून निष्पन्न झाल्याचे सांगत आहेत. माजी आमदार बसवराज पाटील यांनी विधानसभेमध्ये औष्याचा हा प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हापासून या कामाची मागणी सतत होत राहिली. मध्यंतराच्या काळामध्ये पाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बंधूंनी हा प्रश्न प्रखरपणे शासनासमोर मांडला त्यामुळेच योजना मंजूर झाली असे या ठिकाणचे अनेक जण म्हणत आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणविस यांनी आपला माणूस निवडून यावा यासाठी इथल्या पाण्याची योजना मंजूर केली असे अनेक जण म्हणत आहेत. काही का असेना औश्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला ही समाधानाची बाब आहे. भविष्यात अनेकजण या बाबीचा फायदा घेऊन राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतील असेही या ठिकाणाच्या नागरीकांमध्ये चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments