कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आधार प्रतिष्ठानचा आधार
औसा: तालुक्यातील भादा येथील आधार प्रतिष्ठान आणि आधार बचत गटाच्या माध्यमातून भादा सह परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये आधार प्रतिष्ठान तर्फे सामाजिक उपक्रम म्हणून 14 एप्रिल 2021 ची विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानंतर 2021 मधील हा दुसरा सामाजिक उपक्रम महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दि 14 मे 2021 रोजी भादा हरीहर मंदिर सभागृह येथे सकाळी 9:00 वाजलेपासून शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की रक्तदान हे जीवनदान आहे ते कोणत्याही वस्तू सोबत त्याचे मोल किंमत करता येत नाही ते अनमोल आहे म्हणून ते आपल्या हातून आयुष्यात सत्कर्म होवो याकरिता आपण रक्तदान आवश्य करावे आणि इतरांनाही रक्तदानाबद्दल प्रोत्साहित करावे जेणे करून रक्तदानामुळे आपल्या शरीरामधील ही रक्त शुद्धी होते आणि दैनंदिन जीवनात जगत असताना अनेक पुरुष, महिला, बालक यांना कधीही रक्ताची आवश्यकता भासू शकते, याकरिता आपण भविष्याचा विचार करून आजच रक्तदान करू या असे आव्हान आधार प्रतिष्ठान आणि बचत गट यामार्फत करण्यात येत आहे आणि रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधा. 9923482333/9765216666/9763076984/9822662445/9767420188/8108810999

0 Comments