Latest News

6/recent/ticker-posts

प्राणी मित्राने दिले हरणाच्या पाडसाला जीवनदान; प्रथम उपचार करून दिले वनविभागाच्या ताब्यात

प्राणी मित्राने दिले हरणाच्या पाडसाला जीवनदान; प्रथम उपचार करून दिले वनविभागाच्या ताब्यात


केळगाव:{प्रतिनिधी/वसीम मुजावर} निलंगा तालुक्यातील राठोडा येथे शिवारामध्ये भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पाडसा चावा घेतल्याने हरणाचे पाडसे जखमी झाले होते त्यावेळेस स्थानिक शेतकऱ्यांनी धाव घेऊन कुत्र्याच्या तावडीतून हरणाच्या पाडसाला वाचवले व गावातील प्राणीमित्र संस्थेचे प्रमोद पुरी व त्यांच्या मित्राने हरणाच्या पाडसा ला गावात घेऊन गेले त्या हरणीच्या पिल्याला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने चांगली जखम झाली होती त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी राजे यांना संपर्क करून बोलून घेतले व डॉ. राजे यांनी त्या हरणाला प्रथम उपचार करून त्याच्यावर औषध उपचार केले त्यानंतर निलंगा वन परिमंडळ अधिकारी एस आर बन व वनरक्षक नेकनाळे यांना संपर्क करून त्या हरणाची संपूर्ण माहिती सांगितली व त्यानंतर केळगाव लांबोटा वन उद्यानामध्ये जाऊन वन कर्मचाऱ्याल ते हरणाचे पाडस सुखरूप परत केले या मुक्या प्राण्यावर दया करून त्याच्यावर प्रथम उपचार करून जबाबदारीने वनखात्याला सोपवनारेे वन्यजीव संवर्धन संस्था निलंगा चे प्रमुख प्रमोद पुरी, आनंद गुनाले यांनी मुक्या प्राण्याला सुखरूप वन खात्यात सोडल्याने पशू प्रेमी कडून या युवकाचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments