औसा नगरपालिके अंतर्गत जंम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची एम आय एम ची मागणी
शेख बी जी
औसा: दि. - ११ एम आय एम पक्षाचे औसा तालुका प्रभारी अफसर शेख यांनी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आज दि.१० मे २०२१ सोमवार रोजी काळाची गरज ओळखून नगरपालिके अंतर्गत जॅम्बो कोवीड सेंटर सुरू करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पाहता शहरांमध्ये अनेक रुग्णांची हेळसांड होत आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये पुरेशी सोय नसल्यामुळे रुग्णांना बाहेर गावी जावे लागत आहे. या कालावधीत अनेक रुग्णांचे जीव जात आहेत. त्यामुळे माननीय मुख्याधिकारी साहेबांनी नगरपालिके अंतर्गत जंबो कोविड सेंटर सुरू करावे, जेणेकरून होणार त्रास वाचेल व रुग्नांचे जिव वाचतील. आमच्या या निवेदनाचा विचार करून ताबडतोब निर्णय घ्यावा अशी विनंती एमआयएम पक्षाच्या वतिने करण्यात आली आहे. या निवेदनावर एम आय एम पक्षाचे औसा तालुका प्रभारी अफसर शेख यांची स्वाक्षरी आहे.
0 Comments