अक्षय तृतीया, ईद सणावर प्रश्नचिन्ह अत्यावश्यक खरेदीसाठी बाजारपेठेत शिथीलता देण्याची मागणी
कासार सिरसी:(प्रतिनिधी/फेरोज जागीरदार) सध्या 15 मेपर्यंत सर्वत्र लॉक डाऊन असल्याने शुक्रवार तारीख 14 मे रोजी येणारी महात्मा बसवेश्वर यांची जयंती, मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद व हिंदूंचा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त अक्षय तृतीया हे सण कसे साजरे करावेत या सणा साठी लागणारे अत्यावश्यक साहित्य प्रशासनाने पूर्वीप्रमाणे रोज सकाळी सात ते अकरा पर्यंत शिथीलता द्यावी अशी मागणी कासार शिरशी शहर व परिसरातील हिंदू मुस्लिम बांधवातून करण्यात येत आहे. सध्या सर्वत्र कोरोना या आजाराची सामाजिक शृंखला तोडण्यासाठी संचारबंदी लॉक डाउन यासारखे अनेक निर्बंध घालण्यात आले असून येथील पोलिसांच्या वतीने या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत असून 15 मे पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे याचा परिणाम येणाऱ्या सणावर होणार असून त्याअनुषंगाने नागरिकांना अत्यावश्यक खरेदीसाठी पूर्वीप्रमाणे शिथीलता द्यावी व बाजारपेठ दुधाचे फळांचे व भाजीपाल्यांचे दुकाने चालू ठेवावे अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.
0 Comments