Latest News

6/recent/ticker-posts

कोकळगाव मध्ये जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशाला पायदळी तुडवून कडक लॉक डाऊनचा फज्जा

कोकळगाव मध्ये जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशाला पायदळी तुडवून कडक लॉक डाऊनचा फज्जा


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे दुसऱ्याच दिवशी सकाळी चार तास जिल्ह्याधिकार्याच्या आदेशाचे उल्लंघन करत चार तास किराणा दुकाने चालू ठेवत कडक लॉक डाऊनचा फज्जा उडालेला आहे. या दुकानदारांना अभय कोणाचे ?  कासार सिरसी पोलिसांचे नियंत्रण का नाही,येथील बिट हवालदार का पाठराखण करत आहे, दुकानदार आणि बिट हवालदार यांचे संगनमत होते का? जिल्ह्याधिकारी यांच्या आदेश पायदळी तुडवणाऱ्या दुकांदारावर कारवाई होणार का? असा प्रश्न नागरिकाद्वारे व्यक्त केला जातो आहे. तसेच काही दुकानाचे शटर बंद आहेत म्हणायला आहेत, पण पाठीमागून सर्व व्यवहार, सुपारी, गुटखा आदी शौकीनांचे मनोरथ पुरवले जातात. यावरून कोरोनाचा संसर्ग रोखता येईल का? असा प्रश्न सुजाण नागरिकाद्वारे व्यक्त केला जातो आहे.

Post a Comment

0 Comments