Latest News

6/recent/ticker-posts

भादा ग्रा प कडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कंटेनमेंट झोन तयार

भादा ग्रा प कडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कंटेनमेंट झोन तयार 


बी डी उबाळे

औसा: औसा तालुक्यातील भादा येथे सध्या कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने या ठिकाणी गावातील विविध भागात गावातील विविध भागात कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले तयार करण्यात आले आहेत. सध्या भादा येते वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता ग्रामपंचायतीकडून दक्षता घेतली जात असून ग्रामपंचायत कडून रविवार दि 9 मे 2021 रोजी भादा येथील वरवडा रोड(मंत्री नगर), आनंदनगर आदी भागामध्ये रुग्ण आढळून आले आहे. तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करून त्या ठिकाणी प्रवेश निषिद्ध करण्यासाठी काठ्यांनी, दोर बांधून बॅनर लावले जात असून ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी याबाबत दक्षता घेत आहेत व जनजागृती करीत असून ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी हे स्वतः छोटा लाऊड स्पीकर घेऊन भादेकराना कोरोनाविषाणू रोखण्यासाठी विनाकारण घराच्या बाहेर पडू नका, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा किंवा साबणाने स्वच्छ हात धुवा, शारीरिक /सामाजिक अंतर पाळा असे जाहीर नम्र आवाहन ते स्वतः स्पिकरमधून गावांमध्ये करीत विविध भागाध्ये  फिरून केले आहे. भादा गाव कोरोना व्हायरस रक्षण आणि संरक्षण कामी भादा ग्रामपंचायतीचे उपसरपंच बी एम शिंदे नूतन ग्राम पंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे, अमोल पाटील, योगेश लतुरे सह कर्मचारी शिवाजी बनसोडे, नंदू फरताळे, भमू स्वामी, लखन लतूरे आदी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments