निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातून वयाच्या 65 व्या वर्षी आजीने केले कोरोनावर मात
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे कासार सिरसी येथील मंगलबाई जीवन पाटील या रुग्णाला न्यूमोनिया होता अशक्तपणा व श्वास घेण्यास त्रास होत आहे म्हणून दि.26 एप्रिल रोजी रात्री 2:00 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्या आजी कोरोनावर मात करून घरी सुखरूप परतल्या त्या आजींचे बंधू ज्ञानसागर दुराकर म्हणाले माझी बहिणीची आशा आम्ही सोडून दिलो होतो रुग्णालयात दाखल केले तेव्हा ऑक्सिजन 56 होते आता ऑक्सिजन न लावता 98 आहे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप सौंदळे व त्यांची सर्व टिम 24 तास रुग्णाच्या सेवेत हजर आहे. आम्ही ज्या माणसाची आशा सोडून दिलो होतो त्या माणसाला तुम्ही मूर्त्युच्या तावडीतून बाहेर काढलो त्या बद्दल मी आपला आभारी आहे. डॉ.सौंदळे दिवसातून पाच ते सहा वेळेस स्वतःजाऊन रुग्णांची विचारपूस करत असतात त्यांची अडचणी जाणून घेतात लागलीच त्या अडचणी पण दूर करून टाकतात खरंच निलग्यांचे व तालुक्याचे भाग्य आहे की माणसातला देव माणूस आपल्या सामान्य नागरिकांच्या 24 तास सेवेत हजर आहे. मंगल बाई पाटील यांचा मुलगा वर्धमान पाटील म्हणाले माझ्या आईला दि.26 एप्रिल रोजी रात्री 2:00 वाजता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा कुठल्याही प्रकारची टाळाटाळ न करता ऑक्सिजन लावले लागलीच डॉक्टर आले त्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्या पुरवल्या म्हणून माझी आई आज सुखरूप घरी परतली याबद्दल मी वर्धमान पाटील सर्व डॉक्टर व स्टाफ चे आभार मानतो.
0 Comments