चाकुर शहरातील नाल्या तुंबल्याने,पावसाचे पाणी घरात
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर शहरात शुक्रवारी अचानक अवकाळी पाऊसांला सुरुवात झाली व धोधो पाऊस पडल्यामुळे शहरात पाणीच पाणी झाले. जगृत-जागृतीच्या पाठीमाघेल नाली तोडून भरून वाहत होती गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत होते.प्रभाग क्रमांक आठ मधील घरातही नाल्याच्या वरुन पाणी घुसले. टीपु सुलतान चौक व एकता नगरला जाणाऱ्या रस्त्यावर तर तळ्यांचे स्वरुप आले होते. अनेक दिवसांपासुन तेथील नागरिक नाली व पुलांच्या बांधकामासाठी मागणी करीत आहेत. चाकुर शहरातील अनेक भागात नालीतील पाणी घरात घुसल्यामुळे नागरिकांची तारमळ उडाली होती चाकूर शहरातुन सिमेंट रस्ता करण्यात आला आहे.मस्जीद चौक ते लक्ष्मी नगर या भागात रस्त्यावर पडणारे पाणी नालीतुन वाहत नाही तर ते पाणी चक्क घरात घुसत आहे या पावसाचे पाणी या भागातील बऱ्याच जनाच्या घरात घुसले प्रभाग क्रमांक पंधरा मधील पेठ मौहल्ला जवळ असलेल्या घरात तर पाणी जाऊन त्यांचे अतोनात नुकसान झाले. शहारातील पुर्ण कचरा त्यांच्या घरात नालीच्या वरुन आले.कचर्यामुळे सकाळी त्याभागात दुर्गधी सुटली होती त्या लोकांच्या आरोग्य वर यांचा विपरीत परिणाम झाल्यास कोण जबाबदार ? नगरपंचायत घनकचरा व्यवस्थानावर वर्षाला एक कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करते. केंद्र सरकार व राज्य सरकार स्वछतेसाठी करोडो रुपये खर्च करत आहे. याभागात नाल्याची साफसफाई केली जात नाही परिणामी नाल्यात कचरा साठुन त्या तुंबल्या आहेत. ज्या भागात पाणी पडुन घरात घुसले आहे तेथील नागरिक थोड्याशा पाऊसामुळे बेजार झाले आहेत. पावसाळा पुढे आहे मोठा पाऊस जर पडला तर आपला घरच वाहुन जातो का? काय अशी भिती त्याना वाटत आहे. पाऊसाच्या पाण्यामुळे उजळंब रस्त्यारील दोन्ही बाजुच्या नाल्याचा पाणी रस्त्यावर वाहत होते.
0 Comments