Latest News

6/recent/ticker-posts

माझं लातूर परिवाराच्या सदस्यांनी घेतली अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांची भेट

माझं लातूर परिवाराच्या सदस्यांनी घेतली अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांची भेट

135 व्हेंटिलेटर कार्यरत असल्याची डॉ देशमुख यांची माहिती

के वाय पटवेकर

लातूर: कोरोना रूग्णांसाठी डॉक्टर आणि नातेवाईक सतत व्हेंटिलेटरची मागणी करत आहेत. याबद्दल  अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यात  २५ व्हेंटिलेटर केंद्रसरकारच्या निधीतून विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेला मिळाले आहेत. या व्हेंटिलेटरचे इन्स्टॉलेशन झाले नसल्याची चर्चा दोन आठवड्यापासून माझं लातूरच्या चर्चेत होत होती. याबद्दलच वास्तव काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझं लातूर परिवाराचे सन्माननीय सदस्य अॕड. प्रदीप मोरे, डॉ सितम सोनवणे, सतीश तांदळे, संदीप कांबळे, प्रमोद गुडे यांनी अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख सरांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत डॉ.देशमुख यांनी या संस्थेला नवीन २५ व्हेंटिलेटर मिळाले होते त्याचे इन्स्टॉलेशन पूर्ण केले आहे काही जुने बंद व्हेंटिलेटर काढून टाकले आहेत, आजघडीला या संस्थेत १३५ व्हेंटिलेटर कार्यरत असल्याचे सांगितले . माझं लातूर परिवार कोविड रूग्ण नातेवाईंकांना मदत करते. त्यासोबतच  प्रशासनच्या, रूग्णालयाच्या समस्या असतील तर ते जाणून घेण्याचे तसेच त्या सोडविण्यासाठी तत्पर आहेत.

Post a Comment

0 Comments