कासार सिरसी येथील कोविंड सेंटरला अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली भेट
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांपैकी कासार सिरसी ग्रामीण रुग्णालयात सर्वात कमी लसीकरण झाल्यामुळे प्राथमिक स्वरूपात भेट देऊन उपस्थित असलेले लोकप्रतिनीधी, समाजसेवक, तरुणांशी संवाद साधला. मनात भीती न बाळगता लसीकरण मोहीमेसाठी पुढाकार घेऊन कार्य करण्याचे आवाहन केले. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचे नमूद केले.अक्का फाउंडेशनच्या वतीने टास्क फोर्स कार्यान्वित केली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन सुमारे १००० लसींचे डोस तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालय कासार सिरसी येथे ३० ऑक्सिजन बेड उपलब्ध असून येथील डॉ. शेषरावजी शिंदे, डॉ.विश्वेशजी कुलकर्णी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संगीताजी भोसले, डॉ. बालाजी सावंत, आरोग्य परिचारिका रांजनाजी पांचाळ, श्रीमती शिवकन्या स्वामी, श्रीमती शबाना शेख, श्रीमती तत्वशीला कांबळे, श्रीमती संगीता पोतरेजी यांची विचारपूस केली. हे सर्व जण अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देत असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. कोव्हिड सेंटर मधील रुग्णांशी संवाद साधून जेवणाची व्यवस्था, औषध-उपचार याचीही विचारपूस केली. येणाऱ्या काळात औषधाची कुठलीही कमतरता भासणार नाही याचेही नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय कासार सिरसी येथे ऑक्सिजनची कमी भासल्यामुळे अक्का फाऊंडेशनच्या माध्यमातून ०२ ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले. येथील असलेली विद्युत पुरवठाची अडचण पाहता जनरेटरची व्यवस्था करण्याचे नियोजन केले. याप्रसंगी बजरंग जाधव (माजी कृषी सभापती जि. प. लातूर), ज्ञानेश्वरजी बरमदे, बडेसाब लक्कडहारे (उपसरपंच, कासार शिरसी), देवानंद मुळे, सचिनजी बिराजदार, कमलाकर वाघे, गणेश हेबाडे, दत्ताजी इंगळे, रावसाहेब आकडे, किरण पाटील, बाबू लांमजने (मा.सरपंच), बालाजी नाकाडे, दशरथ मुळे, अझर मुजावर, बाबा बागवान आदी उपस्थित होते.

0 Comments