राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान पुरस्कार डॉ.नरसिंह भिकाने यांना जाहीर
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/इरफान शेख) कोरोना सारख्या महामारीच्या संकटात जनसेवेचा वारसा जपणारे निलंगा आपली कर्मभूमी मानणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाने यांना राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे डॉ.भिकाने वैद्यकीय असो वा सामाजिक वा राजकीय वा साहित्यिक(कविता) असो सतत विविध प्रश्नांवर व्यग्र असणारे व लोक घरात असतानाही रोज विविध आंदोलनात रस्त्यावर आहेत.एकच ध्यास जनतेला न्याय देने याचीच नोंद घेत विश्वात्मक मराठी साहित्य परिषद व अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ ज्याचे मार्गदर्शक पदमश्री डॉ विजय कुमार शाह आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांना राज्यस्तरीय "कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान 2021" पुरस्कार जाहीर झाला आहे. याचे वितरण कोविड असल्याकारणाने 9 मे रोजी सायं 6 ते 9 या वेळेमध्ये झूम अप्पद्वारे ऑनलाइन पध्दतीने मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्काराबद्दल डॉ.भिकाने यांचा सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

0 Comments