लातूर जिल्ह्यातील खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी विद्यार्थ्यांची फी कमी करावी- जिजाऊ ब्रिगेड
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) कठीण कोरोना संकट काळात जास्त फी वसूल करणाऱ्या व न्यायालयाचा अपमान करणाऱ्या संस्थांविरुद्ध जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा जिल्ह्यातील जिजाऊ ब्रिगेड संघटनेचे सचिव समाधान ताई माने यांनी केले आहे. मागील वर्षभरापासून कोरोनामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबातील पाल्यांचा शिक्षणाचा खर्च कसा करावा ? असा प्रश्न प्रत्येक कुटुंबापुढे आहे. त्यामुळे खाजगी शाळा व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी कमी करून पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांनी केली होती न्यायालयाने दखल घेत वाढीव फी वसुली करू नये असा आदेश दिल्याने संस्था चालकांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान निवेदनात असे म्हटले आहे की सर्वसामान्य माणसाचे कोरोनामुळे आर्थिक हात बांधले गेले आहेत. कुटूंब कसे सांभाळावे असा प्रश्न आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या फी अव्वाच्या सव्वा झाल्या आहेत. अशातच संस्थाचालकांचा फी साठी तगादा असतो यामुळे पालक अक्षरश वैतागले आहेत. दुसऱ्या शाळेत ऐनवेळी प्रवेश मिळणार नाही याची भिती असल्याने धड पाल्यांना" शाळेतून काढता येईना,फी भरता येईना" अशा चक्रव्यूहात पालक सापडले आहेत. एकतर इंग्रजी माध्यमाच्या शाळा ऑनलाईन सुरु असल्याने संस्थांना इतर खर्चाचा भार कमी लागत आहे. कोरोना संकटकाळात विद्यार्थ्यांकडून कमीत कमी फी घेण्यात यावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष भदाणे यांनी केली होती. न्यायालयाने फि वसुली करू नये असा आदेश दिल्याने न्यायालयाचे आभार मानले आहेत कोरोना संकटकाळात इंग्रजी माध्यमांकडून शाळेकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करण्यात येऊ नये. यावर जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्रात जिल्हावार पथक नेमत अंकुश ठेवावा. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संस्थेकडून फि वसूली साठी तगादा लावला जात असेल अशा पालकांनी जिजाऊ ब्रिगेड पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कोणत्याही शाळेत मुलांना फिस वाढीव मागत असेल तर जिजाऊ ब्रिगेड लातूर जिल्हा अध्यक्ष शिवमती बोराडे ,जिजाऊ ब्रिगेड सचिव शिवमती समाधान माने, कार्याध्यक्ष योगीता ठाकुर, उपाध्यक्ष शिवमती मीराताई देशमुख जिजाऊ ब्रिगेड शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments