Latest News

6/recent/ticker-posts

स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील गावात कुटुंबासाठी प्रशिक्षण

स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील गावात कुटुंबासाठी प्रशिक्षण


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) शुक्रवार दि.7 मे रोजी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कुटुंबासाठी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी 350 गावकऱ्यांनी सहभाग नोंदविले होते. प्रशिक्षणाची सुरुवात अंजना साबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी स्वयं शिक्षण प्रयोग  संस्थेचे बाळासाहेब काळदाते यांनी कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे नियम पाळा,विनाकारण बाहेर फिरू नका,सतत मास्कचा वापर करा,वारंवार हात धुणे,चांगले आहार घेणे, स्वतः व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले.तसेच स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या माधव गोकट्टे यांनी अल्प खर्चात शेती करणे काळाची गरज आहे, घरच्या घरी बिजप्रक्रिया उगवण करणे, गांडूळ खताची निर्मीती करणे ,सेंद्रिय पद्धतीचा वापर करून कमी खर्चात शेती कसे करता येते याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी अंजना साबळे, शितल रनखांब माधव गोकट्टे, यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments