आझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी आशा बोयने
मदनसुरी:(प्रतिनिधी द्रोणाचार्य कोळे) आझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या आशाताई गोविंद बोयने यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष हनुमंत मामीलवाड, प्रदेश अध्यक्ष विजय मोरे, युवा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पाटील यांनी नुकतीच सदरील निवड जाहीर केली. या निवडीचे रविराज गंगाधर, ज्ञानेश्वर जक्कूलवाड, ज्ञानेश्वर भिसे, बाळू नागरवाढ, बापुराव पाटील आदींनी स्वागत केले.

0 Comments