शिरोळ वांजरवाडा येथे लसीकरणास सुरुवात
शिरोळ वांजरवाडा:(प्रतिनिधी/सलीमभाई पठाण) बऱ्याच दिवसापासुन प्रतिक्षेत असलेली कोरोना लसीकरण आज मौजे शिरोळ वांजरवाडा येथे सुरु झाले. लसींचा तुटवडा असतानासुद्धा वारंवार पाठपुरावा करुन शिरोळ येथे लसीकरण करावे हे निवेदन ग्रामस्थांमार्फत ग्रा.पं.ने अंबुलगा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आधिकारी डॉ.रोडे यांना दिलं होते. त्यांनी निवेदनास मान देऊन आज कमी लसी उपलब्ध असतानासुद्धा शिरोळमध्ये लसीकरणास सुरुवात केली. फक्त 30 लसीच उपलब्ध असल्यामुळे लसीकरणावेळी थोडीशी धांदल उडाली होती पण डॉ.रोडे, डॉ.येळकर मॅडम नी समजाऊन सांगीतल्याने लसीकरण व्यवस्थित पार पडलं. हे लसीकरण शिबीर योग्य पध्दतीने सामाजिक अंतर ठेऊन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिरोळचे सरपंच गौतम सुरवसे ग्रा.पं.सदस्य नवाज तांबोळी, सुर्यकांत जाधव, गुंडेराव जाधव, दीपक पुंडे, प्रसाद जाधव, झटिंग कदम, आशा कार्यकर्त्या यांनी मोलाचं सहकार्य केले. सध्या लसीचा तुटवडा असल्यामुळे लस उपलब्ध झाली की आणखी परत शिबीर घेण्याचे आश्वासन डाॅ.रोडे यांनी दिले आहे.
0 Comments