Latest News

6/recent/ticker-posts

ऑनलाईन योगा फिटनेस प्रशिक्षण शिबिराच्या आयोजकांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार

ऑनलाईन योगा फिटनेस प्रशिक्षण शिबिराच्या आयोजकांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार



प्रा.बि.जी.शेख

लातूर:दि.२९ - रुरल अॅड अर्बन योगा असोसिएशन ,माझं लातूर परिवार व आधार प्रतिष्ठान भादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन योगा फिटनेस शिबिराच्या आयोजकांचा सत्कार पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते आज करण्यात आला. १५ जून ते २१ जून या कालावधीत ऑनलाईन योगा फिटनेस कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये योगा विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच आपल्या आरोग्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत व यासाठी काय करायला पाहिजे याबाबतीत संपूर्ण आठवडा ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये अनेक योग प्रेमींनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला रुरल अॅड अर्बन योगा असोसिएशनचे अध्यक्ष के. वाय.पटवेकर माझं लातूर परिवारचे समूह प्रमुख सतीश तांदळे, पत्रकार दिपरत्न निलंगेकर, मेजर डॉ. मधुसूदन चेरेकर, छायाचित्रकार तम्मा पावले, योग गुरु ओंकार गादगे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक चे योगा समंत्रक सौ. संजीवनी सबनीस, आधार प्रतिष्ठानचे बालाजी उबाळे, मराठी अस्मितेचा इशारा उपसंपादक प्रा.बी.जी.शेख,आदि उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments