Latest News

6/recent/ticker-posts

प्रशासकीय सेवेत नुकतीच एंट्री केलेल्या भादेकर भूमीपूत्राचा भादेकरांतर्फे सत्कार

प्रशासकीय सेवेत नुकतीच एंट्री केलेल्या भादेकर भूमीपूत्राचा भादेकरांतर्फे सत्कार


बी डी उबाळे

औसा-भादा गावातील शेतकरी कुटुंबातील प्रतीकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रातील यश संपादन केलेल्या गूणवंतांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकतीच पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झालेले दिलीप रामहरी गवळी यांनी मिळवलेल्या घवघवीत यशामुळे भादेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी कुटुंबातील या तरुणाने मिळवलेले यश हे प्रेरणादायी आहे. सत्यम बालाजी माळी या साॅफ्टवेअर इंजिनियर तरुणाने अत्यंत कष्टाने जर्मनी पर्यंत घेतलेल्या झेपेचे सूद्धा भादेकरांनी  कौतुक केले. तसेच गावातीलचं भारतीय सैन्य दलामध्ये नुकतीच निवड झालेल्या शूभम बळीराम घोडके व वन विभाग कोल्हापूर मध्ये कार्यरत असलेल्या प्रशांत महादेव सोनकांबळे यांचा ही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांचे गूरु तसे भूमीपूत्र असणारे. राजेन्द्र हजारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ग्राम पंचायत कार्यालय भादा व मित्र परिवाराने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रा. पं. सदस्य योगेश लटुरे, अमोल पाटील, सूर्यकांत उबाळे, तानाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले. गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम सरपंच मिनाताई दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली,उपसरपंच बालाजी शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नागनाथ एन फरताळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांनी केले.

Post a Comment

0 Comments