Latest News

6/recent/ticker-posts

चोरीच्या सहा मोटार सायकलीसह एकूण 3 लाख 60 हजार मुद्देमाल जप्त

चोरीच्या सहा मोटार सायकलीसह एकूण 3 लाख 60 हजार मुद्देमाल जप्त


बी डी उबाळे

औसा: भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीवरून आरोपी पवनराजे गुलाब चव्हाण, रा.बेलकुंड याने चोरी करून विक्री केलेल्या एकूण 06 मो. सा. कि. रू. 3 लाख 60 हजार रु चे जप्त केल्या आहेत. सदर मोटरसायकली आरोपीने हा खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे नोकरी करत असून माझ्यावर विश्वास ठेवा मी मोटरसायकलचे कागदपत्र आठ दिवसात तुम्हाला देतो असे सांगून मो. सा लोकांना विक्री केल्या आहेत. सदर आरोपी कडून मो. सा. चोरी करणारी मोठी टोळी निष्पन्न होऊन आणखी बऱ्याच चोरीच्या मो. सायकल मिळण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. पोलिसांकडून नागरिकांना आवाहन जनतेने कोणी बिना कागदपत्राच्या मोटरसायकल खरेदी केली असल्यास त्या चोरीच्या असण्याची शक्यता असल्याने तात्काळ पोलीस स्टेशन भादा येथे संपर्क करून जमा कराव्यात असे आवाहन भादा पोलिसांकडून करण्यात येत आहे. सदर कामगिरी पो अधिक्षक व अपर पो अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार यांचे मार्गदर्शनाखाली API विलास नवले, HC/83 सतीश सारोळे, HC/ 160 चंद्रकांत सूर्यवंशी, NPC/ 1095 शिवरुद्रा वाडकर, NPC/835 चंद्रकांत कलमे, NPC/1259 महादेव चव्हान यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments