Latest News

6/recent/ticker-posts

नांदेड पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांचा मदनसुरी येथे भव्य नागरी सत्कार

नांदेड पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांचा मदनसुरी येथे भव्य नागरी सत्कार



के वाय पटवेकर

निलंगा: नांदेड पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांचा मदनसुरी येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथे केले होते. मुळचे लातुर जिल्हातील शिरूर आनंतपाळ येथील रहिवासी असणारे नांदेड विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी हे मदनसुरीचे येथील जावई आहेत. त्यांची नांदेड येथे बदली झाल्यापासून शिवाजीराव माने यांचे नागरी सत्काराचे नियोजन होते. त्यांच्या कामाच्या व्यस्ततेतील वेळ घेऊन दि 29 जानेवारी रोजी मदनसुरी येथे या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. निसार तांबोळी यांची कार्यप्रणालीचा, कामातील प्रामाणिक पणा, कार्य तत्परता, गुन्हेगारासाठी कर्दनकाळ तर सर्व सामान्यांचे पालनहार अशी ओळख आहे. ते अत्यंत अभ्यासु व हुशार आहेत ते लवकरच राज्याच्या पोलीस महानिरीक्षक पदी विराजमान होतील अशी आशा असल्याचे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी व्यक्त केले तर निसार तांबोळी यांनी माझा एवढा मोठा नागरी सत्कार आज मदनसुरी वासियांनी केला आहे. तसा मि एवढा मोठा नाही पण आपण दिलेला बहुमान हा मला नेहमी उर्जा देणारा आहे. मि नेहमीच प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करतो असतो. ईमानदारी, कष्ट, सचोटी आत्मसात केल्यास काहीही अवघड नसल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. मि आज ज्या पदावर कार्यरत आहे त्या कामाचे सर्व श्रेय हे माझ्या स्टाफ व वरिष्ठ मार्गदर्शकांना देतो. आई वडिलांकडून मिळालेले संस्कार व वरिष्ठांचे लाभलेले मार्गदर्शन हे माझ्या वाटचालीचा फार मोठा वाटा आहे. भविष्य काळात चांगले लोक प्रशासनात यावे त्यात मदनसुरीचे जास्त असावेत अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उद्योजक युसुफ भाई सय्यद यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी संजय माने, लायक पटेल, लाला शेख, मधुकर जाधव, व्यंकट राजे, अशोक जाधव, अशोक सूर्यवंशी, दिलीप जाधव, धनराज लांडगे, विकास सोसायटीचे चेअरमन गोविंदराव पाटील, धोंडीराम जाधव, केरनाथ अप्पा सुर्यवंशी, राजकुमार येकुंडे, गुलाब माने, सुरेश चाफेकर, विलास अहिरे, माधव शिंदे आकाश शिंदे, मोहन धुमाळ, बाशीद शेख, ताजुद्दीन शेख, मैनोदीन सय्यद, सलाउद्दीन सय्यद, सज्जाऊउद्दीन  सय्यद, बाबुराव माने उर्फ कारभारी, कांत पाटील, मदनसुरी येथील ग्रामस्थ तरुण ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन धुमाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक जाधव यांनी केले.

Post a Comment

0 Comments