"माझं लातूर" परिवाराचा ग्रंथसंपदा भेट देऊन गौरव"
लातूर: पुणे येथील सुप्रसिद्ध प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने काल जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून उदगीर येथील अ भा साहित्य संमेलनात लातूर येथील "माझं लातूर" या सामाजिक परिवाराचा ग्रंथसंपदा (65 नावाजलेल्या साहित्य कृती) भेट देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक तथा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक दामोदर मावजो यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकप्रिय कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते ही ग्रंथसंपदा माझं लातूर परिवाराच्या सदस्यांना सुपूर्द करण्यात आली.
मेहता पब्लिशिंग हाऊसचे दिवंगत संचालक सुनिल मेहता यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही ग्रंथसंपदा भेट दिली जाते. माझं लातूर परिवाराचे सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान आणि समाजोपयोगी उपक्रमांची दखल घेत मेहता प्रकाशन संस्थेने माझं लातूर परिवाराची निवड करून हा सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी माझं लातूर परिवाराचे सतीश तांदळे, अभय मिरजकर, प्रमोद गुडे, डॉ सितम सोनवणे, काशिनाथ बळवंते, संजय स्वामी, निशांत भद्रेश्वर, जुगलकिशोर तोष्णीवाल यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी नागरिक आणि प्रकाशन संस्थेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


0 Comments