शिवणी(बु) येथे बुद्ध-भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील शिवणी(बु) येथे बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शिवणी(बु) येथे दि 24 एप्रिल 2022 रोजी भारत रत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त भिम शाहीर प्रमोद लोखंडे यांचा बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या बुद्ध भीम गीतासाठी औसा तालुक्यातील आणि लातूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांनी आणि भीम प्रेमींनी जयंती आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवणी बु येथील भीमसैनिकांनी केले आहे.

0 Comments