Latest News

6/recent/ticker-posts

परिचारिकांचं कामबंद आंदोलन;आरोग्य व्यवस्थेवर ताण

परिचारिकांचं कामबंद आंदोलन;आरोग्य व्यवस्थेवर ताण



निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी आणि इतर मागण्यासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचं कामबंद आंदोलन सध्या सुरु आहे. परिचारिकांच्या या भूमिकेमुळं आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. 
राज्यातील सर्वच ठिकाणाच्या परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी मागील काही दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु केले आहे. मात्र सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.यामुळे राज्यभरातून आंदोलनाची धार तीव्र करण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. त्याचे पडसाद आज निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उमटले आहेत.
संघटनेच्या वतीने 23 मे ते 25 मे पर्यंत राज्यव्यापी आंदोलन केले. बाह्य स्त्रोताद्वारे (कंत्राटी) पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे 23 ते 25 मे पर्यंत राज्यात सर्व प्रशासकीय जिल्ह्यातील रुग्णालयात 1 तास काम बंद आंदोलन आणि निदर्शने करायला सुरुवात झाली होती. मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळं परिचारिका संघटना आक्रमक झाली आहे. काय आहेत मागण्या खासगीकरण करु नये, आरोग्यसेवा आणि परिचारिकांची भरती कंत्राटदाराच्या हातात देऊ नये, पदनाम बदलाचा विषय मार्गी लावला, पदभरती आणि पदोन्नतीबाबत निर्णय, परिचारिकांसाठी राखीव निवासस्थान द्यावं, समान काम, समान वेतन.

Post a Comment

0 Comments