खा. सुप्रियाताई सुळे पवार याना लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची विद्यापीठ निर्माण कृती समितीची मागणी
लातूर: दि.२८.०५.२०२२२ रोजी आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृति समिति लातूरच्या वतिने खा सुप्रियाताई सुळे- पवार याना शिष्ट मंडळाद्वारे लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचीं मागणी करण्यात आली आहे. लातूरचे सुपुत्र लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून २००७ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड उपकेंद्र पेठ लातुर येथे सुरु करण्यात आले आहे. लातुर जिल्हयातंर्गत कला, वाणिज्य, विज्ञान ,औषधनिर्माण शास्त्र, विधी, अभियांत्रिकी, वैद्यकीय अनुदानित ३६ महाविद्यालय,कायम विनाअनुदानित ८० असे एकूण ११६ महाविद्यालय आहेत व त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या ५५,४१०आहे ,या प्रशासकीय शैक्षणिक कामाचे स्वरूप लक्षात घेता महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालकांना नांदेडला पायपीठ करावी लागते आहे. लातुर जिल्हाचा शिक्षणातील भरारी पाहता लातूर पॅटर्न राज्यात व देशात सर्वदूर परिचीत आहे.समितीच्या वतीने लातूरला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी शासन दरबारी वेळोवेळी लावून धरलेली आहे, विद्यार्थ्याच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी लातुरला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी सातत्याने करीत आहोत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख, राष्ट्र्वादीचे नेते तथा मंत्री ना संजय बनसोडे यांनी ही उपकेंद्राच्या शैक्षणिक कामकाजात ठराविक मर्यादा असल्यामुळे स्थानिक पातळीवर निर्माण होणारी शैक्षणिक व प्रशासकीय गैरसोय टाळण्यासाठी लातुर येथे स्वतंत्र विद्यापीठ करणे बाबत सहानुभूती पूर्वक विचार व्हावा अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे, ना उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेले आहे सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग नांदेड व कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे शिफारस अहवालावरून लातुर येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्या बाबत विद्यापीठ कायदा २०१६ अंतर्गत कलम ३(२)नुसार शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही होणे गरजेचे असल्याचा अहवाल डॉ. धनराज माने, शिक्षण संचालक,उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी दि.१५.९.२०२० च्या पत्रांनव्ये अप्पर मुख्य सचिव,उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांना सादर केलेला आहे, त्यामुळे निकषांवर लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन होने गरजेचे व आवश्यक आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार याना ही दि.४ मार्च २०२२ रोजी निवेदनाद्वारे अवगत केलेले आहे. याची माहिती मुख्य संयोजक अँड प्रदिपसिंह गंगणे यानी खा. सुप्रियाताई सुळे यांना दिली आहे. लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने संबंधिताना सूचना द्यावेत ही विनती शिष्ट मंडळाद्वारे करण्यात आली यावेली धनराज जोशी, अँड अमितकुमार कोथमीरे, सुनील खडबडे, ताहेरभाई सौदागर,अँड वैभव काळे, सौरभ मेहंदळे, अँड सुनिल फावडे, महेश विजापूरे, गणेश कागे, जमालोद्दीन मणियार,जोतिराम कांबळे, वीर धोडीराम, परमेश्वर धोंडे आदी उपस्थित होते.
0 Comments