Latest News

6/recent/ticker-posts

नरेंगाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सोनकांबळे यांनी दाखविला आमदार, माजी मुख्यमंत्र्यांना औशाचा विकास

नरेंगाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सोनकांबळे यांनी दाखविला आमदार, माजी मुख्यमंत्र्यांना औशाचा विकास 


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली यामध्ये मातोश्री शेत रस्ते, सिंचन विहीर, गोठे या योजना पुर्ण करण्यात आली या करिता सहायक कार्यक्रम अधिकारी साहेबराव सोनकांबळे यांनी नुकत्याच झालेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि औसा आमदार अभिमन्यू पवार यांच्या दौर्‍यामध्ये झालेली नरेगाची कामे पूर्ण करण्यात आली ती प्रत्यक्ष फिल्डवर भेट देऊन जे 1 हजार की. मी. रस्ते झाले आहेत, तालुक्यातील सिंचन विहिरी कशा पद्धतीने पूर्ण झाल्या आहेत आणि अनेक योजना मानवाच्या फायद्यच्या आहेत परंतु शेतातील गोठा हा केवळ जनावरांसाठी उपयोगी आहे. म्हणून आ. पवार यांनी गोठ्याची योजना तालुक्यत मॉडेल म्हणून वापरून मानवा प्रमाणेच पशूंचे हि निवाऱ्याची मोठे कल्याण केलेची चर्चा औसा तालुक्यात आहे. हा सर्व औसा तालुक्याचा झालेला विकास दाखविण्यासाठी पंचायत समितीतील नरेगा विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एस.ए. सोनकांबळे यांनी सर्व कामे हे फिल्डवर जाऊन माजी मंत्री,आमदार यांना आवगत करुन दाखविली. यावेळी या दौऱ्यामध्ये गट विकास अधिकारी,विस्तार अधिकारी,तांत्रिक अधिकारी,ग्राम सेवक,ग्राम रोजगार सेवक,सरपंच आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments