शिव स्वराज्य दिनानिमित्त महाराष्ट्र महाविद्यालयात अभिवादन
निलंगा:(विशेष प्रतिनिधि/ इरफान शेख) महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिव स्वराज्य दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव कोलपूके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिव स्वराज्य दिन म्हणजेच शिवाजी महाराजांनी विधीवत राज्याभिषेकाच्या माध्यमातून छत्रपती ही उपाधी धारण केल्याचा दिवस होय. ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांनी हा समारंभ घडवून आणून तत्कालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक व्यवस्थेत एक नवा परीमाण निर्माण केले होते. छत्रपती पदाच्या माध्यमातून स्वराज्याचे रुपांतर सुराज्यात करून स्वराज्याला दिर्घायुषी बनवण्याचे काम महाराजांनी केले होते. म्हणून शिवस्वराज्य दिवस हा आजही तेवढाच प्रेरणादायी व मार्गदर्शक असा आहे.
या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व अभिवादन कार्यक्रम प्रसंगी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.सुभाष बेंजलवार यांनी प्रतीपादन केले. या अभिवादन समारंभ प्रसंगी डॉ. धनंजय जाधव, दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ.आयशा सिद्दिकी, डॉ.शेषराव देवनाळकर, डॉ. गोविंद शिवशेट्टे, डॉ. नरेश पिनमकर, प्रा. गोविंद शेंडगे, ग्रंथपाल मिनाक्षी बोंडगे, दिलीप सोनकांबळे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमाजी तोरकड, गणेश वाकळे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments