Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

भादा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा


बी डी उबाळे

औसा: रविवार दि 5 जून 2022 जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भादा ग्रामपंचायतच्या वतीने भादा गावातील प्रत्येक घराच्या समोर एक नारळाचे झाड लावायचे व ते जगवायचे, "एक कुटुंब एक झाड" या प्रमाणे 2001 नारळाची झाडे लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.तसेच शासनाचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट या दोन्ही वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा शुभारंभ आज 5 जून 2022 रोजी सकाळी 11:30 वा औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश पाटील यांच्या शुभ हस्ते नारळाचे झाड लावून करण्यात आला. यावेळी अशोक मादळे, विस्तार अधिकारी पं, बालाजी पोतदार विस्तार अधिकारी पं,बी एम शिंदे उपसरपंच,माणिक सूर्यवंशी ग्रामविकास अधिकारी,तय्यब पठाण ग्रामपंचायत सदस्य,दीपक मानधने शालेय समिती अध्यक्ष आणि ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments