"ग्रामीण मतदार संघ विकासापासून वंचित" भादा येथील सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात आ.कराड यांचे प्रतिपादन.
बी डी उबाळे
औसा: लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात असलेल्या औसा तालुक्यातील भादा येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेश कराड यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरा समोरील सभागृहाचे रविवारी शानदार कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.
सभागृह उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने आ रमेश कराड यांचे ग्रामस्थांनी वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करून जंगी स्वागत केले. यावेळी मंदिरात विठ्ठल रुक्मिणी यांची पूजा करून फित कापून सभागृहाचे उद्घाटन आ. कराड यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मीनाबाई दरेकर या होत्या.यावेळी बोलताना आ.रमेश कराड यांनी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगून मिळालेल्या पदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचे आणि गेल्या पंधरा वीस वर्षापासून वंचित असलेल्या या भागातील गावात विकासाची कामे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे बोलून दाखविले. या भागातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आणि त्यांची कामे कुठेही दिसत नाहीत. उलट ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक आणि पिळवणूक केली जात आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीत भाजपाचे सदस्य असते तर निश्चितच या भागात विकासाची अधिक कामे झाली असती येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीत भाजपाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे,किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, महिंद्र गोडभरले, वसंत करंमुडे, पद्माकर चिंचोलकर, श्रद्धा जगताप,अनुसया फड, आरती राठोड, राजकीरण साठे, सतीश कात्रे, गुणवंत करंडे, बालाजी शिंदे, अक्षय भोसले,रवींद्र पाटील, राम, पटणे,पांडुरंग कात्रे,अर्जुन लटूरे,भरत उबाळे,सहदेव हजारे, सूर्यकांत पाटील, दिनकर माळी, मनमत पाटील, शाहूराव गवळी, रेवन गायकवाड, नामदेव बनसोडे,बालाजी साळुंके,सत्यशीला बनसोडे, तानाजी गायकवाड,वग्रसेन घोडके,संजय बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित ग्रामस्था समवेत आ रमेश कराड यांनी पंक्तीत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
0 Comments