Latest News

6/recent/ticker-posts

धानोरा सोसायटीच्या चेअरमन पदी व्यंकटराव जाधव व व्हाईस चेअरमन पदी बालाजी थोरमोठे यांची बिनविरोध निवड

धानोरा सोसायटीच्या चेअरमन पदी व्यंकटराव जाधव व व्हाईस चेअरमन पदी बालाजी थोरमोठे यांची बिनविरोध निवड


निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) निलंगा तालुक्यातील धानोरा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या. धानोरा मागील पंचवार्षिक कालावधीत सोसायटीने चांगले कामकाज केल्याने शेकऱ्यांनी पुन्हा 2022 ते 27 या पंचवार्षिक साठी चेअरमन पदी व्यंकटराव भवानराव जाधव व व्हाईस चेअरमन पदी बालाजी चंदरराव थोरमोठे यांना बिनविरोध निवडून दिले. धानोरा सोसायटीची निवडणुक माजी जिल्हा परिषद सदस्य भरत गोरे यांच्या नेतृत्वात बिनविरोध झाली. धानोरा सोसायटी चेअरमन व्यंकटराव भवानराव जाधव वर्ष 1999 पासून आजतागायत चेअरमन पदी कार्यरत आहेत शेकऱ्यांनी पुन्हा 2022 ते 27 या पंचवार्षिक साठी चेअरमन व्यंकटराव भवानराव जाधव व यांच्या संचालक मंडळाला बिनविरोध निवडून दिले. चेअरमन व्यंकटराव जाधव यांना विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा 23 वर्षाचा अनुभव असल्याने गावातील शेतकऱ्यांनी सोसायटी निवडणूक पुन्हा एकदा बिनविरोध निवडून दिली. नवनियुक्त चेअरमन जाधव यांनी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल सर्व पक्षीय नेत्यांचे व शेतकऱ्यांचे आभार मांडले नूतन संचालक भरत गोरे, दिलीप पाटील, दिनकर जाधव ,व्यंकट टोंपे , राजकुमार जाधव ,गोरख जाधव ,वेदकुमार थोरमोठे ,सरूबाई जाधव ,भगिरथी जाधव ,पंढरीनाथ बारतोंडे ,बब्रुवान काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या बिनविरोध निवडीबद्दल गावातून चेअरमन ,व्हा.चेअरमन व संचालक मंडळाचे अभिनंदन होत आहे यावेळी उपस्थित माजी सरपंच सुरेश जाधव , गोविंद जाधव , सीताराम जाधव ,चंद्रकांत धानुरे , राघव थोरमोठे आदी जण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments