लातूर येथे माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी उत्साहात
लातूर: आज दि. 08 जून 2022 रोजी लातूर येथे माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी उत्साहाने साजरी करण्यात आली. लातूर जिल्हा माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमीच्या निमित्ताने दरवर्षी शोभायात्रा काढण्यात येते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी महेश नवमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी महादेव आणि माता गौरीची पूजा केली जाते. माहेश्वरी समाजात महेश नवमीचे विशेष महत्त्व मानले जाते. महेश नवमीच्या दिवशी माहेश्वरी समाजाचा जन्म झाला असे मानले जाते.
या वेळी समाजबांधवांनी शाहरातून काढलेल्या शोभायात्रेने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील मोतिनगर येथील कोरे गार्डन पासून या शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. मोतीनगर येथून सुरु झालेली ही शोभा यात्रा हनुमान चौक, गोलाई, सुभाष चौक मार्गे बालाजी मंदिर येथे भगवान महेश (महादेवाच्या) मूर्तीसह अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये वाजत गाजत बालाजी मंदिर येथे आगमन झाले. शोभायात्रे दरम्यान खास परळी येथून आलेल्या बालगोपाळांच्या वारकरी दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले. शेवटी बालाजी मंदिर येथे भगवान महेशाची आराधना करून कार्यक्रमाची सांगता झाली.
या शोभायात्रेत राहुल भुतडा, मनोज भंडारी, प्रमोद भुतडा, रमण काबरा, Adv. संतोष सोनी, राम भूतड़ा, सागर तापडिया, नयन भंडारी, किशोर सोनी, पुरुषोत्तम सोनी, आनंद सारडा, रोहित लड्डा, गुलाबचंद तापडिया, महेंद्र नोगजा,सुनील राठी,विनोद राठी,मनोज झंवर, संतोष सारडा, विनोद भुतडा, गोविंद बजाज सह शहरातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments