Latest News

6/recent/ticker-posts

गर्दी अन् टाळ्यांचं रूपांतर मतदानात होणार का आणि कसे ?

पत्रकार- हमीद शेख यांच्या लेखणीतून...

गर्दी अन् टाळ्यांचं रूपांतर मतदानात होणार का आणि कसे ?


मआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची परवा आमच्या लातूरला जंगी सभा झाली. ओवेसींचे भाषण ऐकायला ताजुद्दीनबाबा दर्गा परिसर अक्षरक्षः माणसांनी भरून गेला होता, हजारोंच्या संख्येने तरुणाई ओवेसींना ऐकण्यासाठी जमली होती.आज घडीला देशातील मोजक्या नेत्यांना ऐकायला बिन पैशाची गर्दी जमते त्यात ओवेसी यांचा नंबर टॉप मध्ये येतो. ओघवती भाषाशैली लोकांच्या भावनांना साद घालण्याची कला, विषयांची जाण, सोबतच मुस्लिम प्रश्न मांडण्याची पद्धत आणि बेबाकपणा यामुळे ओवेसींच्या सभांना देशभरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते, आणि लातूरला झालेली सभा ही त्याच प्रकारातली म्हणायला हरकत नाही. या सभेतून ओवेसींनी नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली यासोबतच त्यांचा पक्ष येत्या काळात लातूर जिल्ह्यात होणाऱ्या सर्व निवडणुका लढणार असल्याची घोषणा करत लातूरकरांनी एमआयएम ला खंबीरपणे साथ देण्याचा आवाहन केलं. ओवेसींच्या या सभेला मिळालेला गर्दी आणि टाळ्यांचा प्रतिसाद हा रेकॉर्डब्रेक होता असं म्हणायला हरकत नाही परंतु हा गर्दी अन् टाळ्यांचा प्रतिसाद मतदानात बदलणार का ? हा खरा प्रश्न आहे.

मागच्या दहा वर्षात ओवेसी आणि त्यांच्या पक्षाने देशभरात मुस्लिमांचा पक्ष अशी आपली ओळख निर्माण केली आहे. कुठल्याही मुस्लीम प्रश्नांवर ओवेसींनी बोलावं अशी अपेक्षा आज देशभरातून व्यक्त होत असते, तसेच मुस्लिम प्रश्नांवर त्यांची टिप्पणी महत्त्वाची मानली जाते.ओबीसी स्वतः मी कास्ट पॉलिटिक्स करतो असं म्हणत नसले तरी ते मुस्लिमांच्या प्रश्नांवर संसद, मिडीया व इतर व्यासपीठांवर आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात आणि अनेकदा सामान्य मुस्लिमांना त्यांची ती भूमिका पटत असते. एमआयएमवर भाजपाची बी टीम असल्याचा तसेच ओवेसी व त्यांचा पक्ष धार्मिक कट्टरतेला उत्तेजन देत असल्याचा आरोप ही होत असतो.तरीही ओवेसी यांचा फॅन फोलो मागच्या कांही वर्षात कमालीचा वाढला आहे. पण तो वाढलेला फॉलॉअर मतदारात बदलत नाही ही वस्तुस्थिती आहे.आणि तो का बदलत नाही याचा विचार ओवेसी साहेबांनी करायला हवा. ओवेसी प्रचंड हुशार आहेत, नेतृत्वाचे सगळे गुण त्यांच्याकडे आहेत.पण ग्राउंड लेव्हलवर पक्षाचं काम नगण्य या स्वरूपात मोडतं. फक्त लातूर पुरतं बोलायाचं झालं तर लातूर हे मुस्लिमबहुल शहर आहे. सामान्य लातूरकरांसोबत इथे मुस्लिमांच्या ही अनेक आहेत.या समस्यांना पक्ष म्हणून एमआयएम वाचा फोडताना दिसत नाही.इथे पक्षाला मजबूत संघटन नाही की धोरण. परवा तर खासदार ओवेसींना कार्यकर्त्यांना भेटू दिलं नसल्याच्या तक्रारी आहेत. आता हा गल्लीचा प्रॉब्लेम आहे की हायकमांड चा हे तेच जाणो. इमोशन्स, धर्म, जात, पैसा या सगळ्या बाबी निवडणुकांवर परिणाम करत असल्या, तरी निवडणुका फक्त वरील बांबीवर जिंकता येत नाहीत त्यासाठी निष्ठेने आणि तत्त्वं इमानदारीने जमिनीवर काम कराव लागतं. लोकांमध्ये आपल्या कामातून, कृतीतून विश्वास निर्माण करावा लागतो.लोकांची मने जिंकावी लागतात तेंव्हा लोकं तुम्हाला तुम्ही कोण, कुठल्या पक्षाच्या आहात हे न पाहता निवडून देतात. मुस्लिम समाज याबाबतीत कमालीचा जागरूक आहे, त्यांना जिथे विश्वासू पर्याय दिसतो तिथे त्याला साथ देतात ममता,मुलायम लालू, पवार, नितेश, ही त्याची काही उदाहरणे आहेत. गरज आहे तो विश्वास निर्माण करायची अन्यथा नुसती गर्दी आणि टाळ्या यावरच समाधान...


पत्रकार- हमीद शेख,लातुर

Post a Comment

0 Comments