Latest News

6/recent/ticker-posts

नेरूळ मधील सराईत 2 गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

नेरूळ मधील सराईत 2 गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

नवी मुंबई:  जिल्ह्यातील बेलापूर न्यायालया कडील कोर्टातीळ केस क्रमांक आरसीसी 684/ 2019 भा द वि कलम 392 341 34 मधील फरार आरोपी बोनी शंकर साळुंखे वय 23 वर्ष राहणार सेक्टर एक शिरवणे नेरूळ व अजय सिताराम राठोड 23 वर्ष राहणार सेक्टर क्रमांक 6 सारसोळे यांचे वर अजामीनपात्र वॉरंट बेलापूर न्यायालयाने जारी केले होते. त्या अनुषंगाने  श्याम शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेरूळ पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विजय कांगणे व  रशीद पटवेकर यांच्या पथकाने नमूद आरोपीस गुप्त बातमीदारामार्फत  माहिती मिळतास त्यांना सापळा लावून शिताफतीने ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील आरोपी बोनी साळुंखे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. नमूद दोन्ही आरोपी हे जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, नमूद केलेल्या कारवाईबद्दल नेरुळ नवी मुंबई पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments