लातूर जिल्हात कोरोनाचा उद्रेक; जिल्ह्यात आढळले आज सर्वात जास्त कोरोनाचे 29 पॉझिटिव्ह रुग्ण
लातूर: जिल्ह्यात मागील काही महिन्यापूर्वी कमी झालेले कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढायला जून महिन्यापासून सुरुवात झालेली असून आज गुरुवार दिनांक 7 जुलै रोजी लातूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने मोठा हादरा दिला आहे जिल्ह्यात सर्वात जास्त आज गुरुवारी 29 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने लातूरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यातच आज आरोग्य प्रशासनाने कोरोनाच्या चाचण्याही वाढवल्या असून एकूण 899 चाचण्या आरोग्य प्रशासनाने केले आहेत यामध्ये 29 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत.
लातूर जिल्ह्यात अरटीपीसीआरच्या 354 चाचण्या केल्या यामध्ये एकूण 19 पॉझिटिव रुग्ण आढळले आहेत तर रयपीड अँटीजनच्या 545 चाचण्या केल्या यामध्ये 10 पॉजिठीव आढळून आलेले आहेत आज एकूण 899 चाचण्या केल्या असून यामध्ये एकूण 29 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत लातूर जिल्ह्याचा कोरोणाचा पॉजिटिवी रेट 3.2 टक्केवर आला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल एस देशमुख यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या आव्हालात नमूद केले आहे.
0 Comments