Latest News

6/recent/ticker-posts

दिव्यांगाच्या सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार 2025 वर्षासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत

दिव्यांगाच्या सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार 2025 वर्षासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत


लातूर : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली यांच्यामार्फत दिव्यांगाच्या सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात या अंतर्गत 2025 सालासाठी ऑनलाईनल पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उत्कृष्ट व्यक्ती व दिव्यांगाच्या संस्थांनी 15 जुलै 2025 पर्यंत www.awards.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर पुरस्कार दिव्यांग व्यक्तींना वैयक्तीक पातळीवर तसेच दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना देण्यात येणार आहेत. सदर पुरस्काराची परिपूर्ण माहिती www.depwd.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. वैयक्तीक प्रकारात 1. सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन, 2.  श्रेष्ठ दिव्यांगजन, 3. श्रेष्ठ दिव्यांग बाल / बालिका, 4. दिव्यांगजनों के सशक्तीकरण के लिए कार्यरत श्रेष्ठ व्यक्ती, 5. दिव्यांगता के क्षेत्र में कार्यरत श्रेष्ठ पुनर्वास पेशेवर, 6. दिव्यांगता के क्षेत्र में श्रेष्ठ अनुसन्धान / नवप्रवर्तन / उत्पाद विकास. आदी प्रकारात देण्यात येणार असून दिव्यांगांच्या संस्थांसाठी 1. दिव्यांग जनो के सशक्तीकरण में कार्यरत सर्वश्रेष्ठ संस्थान, 2. दिव्यांगजनों के लिए सर्वश्रेष्ठ नियोक्ता, 3. दिव्यांगजनों के लिए सर्वश्रेष्ठ प्लेसमेंन्ट एजेंन्सी, 4. सुगम्य भारत अभियान के कार्यान्वयन / बाधामुक्त वातावरण के सृजन मे सर्वश्रेष्ठ राजय्/संघ राजय्‍ क्षेत्र/जिल्हा, 5. सर्वश्रेष्ठ सुगम्य यातायात के साधन / सुचना एवं संचार प्रौद्यागिकी, 6. दिव्यांगजन अधिकार अधिनियम / विशिष्ठ दिव्यांगता पहचान पत्र एवं दिव्यांगजन सशक्तीकरण की अन्य योजनाओं के कार्यान्वयन मे सर्वश्रेष्ठ राजय्/संघ राजय्‍ क्षेत्र/जिल्हा, 7. अपने राज्य / संघ राज्य क्षेत्र मे दिव्यांगजन अधिकार अधिनियम के कार्यान्वयन में सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करने वाले राज्य दिव्यांगजन आयुक्त, 8. पुनर्वास सेवाओं हेतु पेशेवर तैयार करने वाला सर्वश्रेष्ठ संस्थान सदर राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येत आहेत. तरी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीं व दिव्यांग क्षेत्रात कार्यरकणाऱ्या संस्थांनी 15 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद लातूर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments