Latest News

6/recent/ticker-posts

संततधार पावसातही भरला भादा येथे आठवडी बाजार

संततधार पावसातही भरला भादा येथे आठवडी बाजार


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथे भरणारा भाजीपाला विक्री आठवडी बाजार मंगळवार दिनांक 12 जुलै 2022 रोजी आठवडी बाजार भरला असून या संततधार पावसामध्ये भाजी विक्रेते आणि ग्राहकही खरेदी करताना दिसून आले.

ग्रामीण भागामध्ये सध्या आठवडी बाजारात भरत असल्याने आठ दिवसांसाठी लागणारा भाजीपाला हा गावातच खरेदी केला जात आहे. यामुळे अनेक नागरिक औशावरून खरेदी करणारा भाजीपाला हा गावांमध्येच खरेदी करत असल्याने आता ग्रामीण भागातही आठवडी बाजार फुलत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या बाजारामुळे शेतकरी यांनाही आपला भाजीपाला स्थानिक पातळीवर विक्री करता येत आहे तर ग्राहकांनाही स्वच्छ आणि चांगला ताजा भाजीपाला गावातच मिळत असल्याने शेतकरी ग्राहक खुश असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तर संततधार पावसामुळे नागरिकांची आणि शेतकरी व्यापारी यांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

Post a Comment

0 Comments