लातूर येथे तायक्वांदो स्पर्धा उत्साहात
"खेळ, युद्ध कला या जीवनाचा अविभाज्य घटक असून, क्रीडाक्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी राजाश्रय महत्वाचा आहे. - मास्टर नेताजी जाधव"
लातूर: शैलेश लाहोटी यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि ०९ जुलै रोजी श्री केशवराज विद्यालय येथे सब-जुनियर व जुनियर वयोगटातील मुलांच्या जिल्हास्तर तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन लातूर माहेश्वरी सभेचे गणेश हेड्डा यांच्या हस्ते पार पडले तर बक्षीस वितरणासाठी राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कुल चेअरमन आनंद लाहोटी, आदित्यजी लाहोटी यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धा अञिवरद प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण शिवणगिकर यांनी आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत साधारण २४ वजनी गटात ५६ खेळाडूनी सहभाग नोंदविला. विविध वजनी गटात प्रथम क्रमांकावर कु. यश मठपती सोहम मेनकर, अनुश्री कुलकर्णी, सहस्रा योगी, समर्थ बनसोड, गितांजली नागरगोजे, प्रबोधनी सुर्यवंशी, दुर्वा बिडवे, अभिषेक अग्रोया, श्रावस्ती बनसोडे, रुद्राक्ष रुमने, तपस्वी परिहार, स्वरा नागरगोजे, अब्राहम सय्यद तर द्वितीय क्रमांकावर शाश्वती योगी, इशिता योगी, विवांशी अंदुरे, रागिनी शिरसागर, प्रगती सोमवंशी, प्रथमेश सोमवंशी, आद्या माले, विश्वजीत जाधव, शैलेश स्वामी नेवासकर हे विजयी ठरले आहेत.
या स्पर्धेचे तांञीक बाजु एस व्हि कुलकर्णी यांनी सांभाळली. पंच म्हणून श्रद्धा कुलकर्णी, धनश्री मदने, प्रेरणा सोरडे, अदिती मेनकर, जान्हवी मदने यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी अरुण कुलकर्णी यांनी प्रयत्न केले. स्पर्धेचे सुञसंचलन सौ मठपती यांनी तर आभार शिवणगिकर यांनी मांडले. सर्व विजयी खेळाडूंचे तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व सचिव नेताजी जाधव, अञिवरद प्रतिष्ठान चे सचिव जयकिरण परदेशी, योगेश कुलकर्णी, प्रा गणेश शाबादे, संतोष बेंबळकर, प्रवीण परदेशी, प्रणव शिवणगिकर, आशिद बनसोडे, प्रा विनोद चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments