मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा
लातूर:(जिमाका) दि. 12 - मांजरा, तेरणा व तावरजा नदीवरील बराज, को. प. बंधारेच्या पाणलोट क्षेत्रात येवा सुरु असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पर्जन्यवृष्टी राहून येवा प्रकल्पात येणारा येवा असाच राहीला तर प्रकल्प केंव्हाही निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर प्रकल्पात येणारा येवा मांजरा, तेरणा व तावरजा नदीमार्गे सोडावा लागणार आहे.
मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करुन राहीलेले नागरिक यांना सावधानतेचा इशारा लातूर पाटबंधारे विभाग क्र. 1 लातूरचे कार्यकारी अभियंता रो.सु. जगताप यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0 Comments