Latest News

6/recent/ticker-posts

नवी मुंबईच्या भारतीय संविधान जनजागृती विचारमंचावर माझं लातूर परिवाराची संविधान उद्देशीका

नवी मुंबईच्या भारतीय संविधान जनजागृती विचारमंचावर माझं लातूर परिवाराची संविधान उद्देशीका


नवी मुंबई: संविधान फाऊंडेशन नागपूर, मुंबई विभागाच्या वतीने आयोजित भारतीय संविधान जनजागृती सोहळयातील विचारपीठावर लावण्यात आलेली माझं लातूर परिवाराची संविधान उद्देशीका मान्यवरांचे लक्ष वेधून घेत होती.


संविधान दिनाचे औचित्य साधून देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्याच अनुषंगाने वाशी, नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संविधान जनजागृती अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या अभिवक्ता ॲड. पल्लवी मनोज राजपक्षे यांची तर उद्घाटक म्हणून भा प्र से (नि) अधिकारी तथा संविधान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इ. झेड. खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध संविधानतज्ञ ॲड. डॉ.सुरेश माने यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

माझं लातूर परिवाराच्या वतीने गत एक वर्षापासून शाळेत आणि शासकीय कार्यालयात मोफत संविधान उद्देशिका वितरण करण्याचा दिशादर्शक उपक्रम राबविण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची मूल्य रुजावित, संविधानाप्रती आदर आणि आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम लातूर, नांदेड जिल्ह्यासह, सीमावर्ती भागातील शाळांमध्ये दर्शनी भागात संविधान उद्देशीका लावून राबविला जात आहे.

माझं लातूर परिवाराचे सदस्य तथा मराठी अस्मितेचा इशाराचे संपादक के. वाय. पटवेकर यांनी संविधान जनजागृती उपक्रमात भारतीय संविधान प्रास्ताविक भेट दिली. तसेच

उपस्थीत सर्व मान्यवरांनी माझं लातूर परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक करीत यांचे अनुकरण देशभरात झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकास स्वतंत्रपणे व स्वाभिमानाने जगण्याचा हक्क प्रदान केला आहे. लोकशाही प्रगल्भ करणे, समानता, स्वातंत्र, बंधुता, न्याय व हक्क या कर्तव्याची जाणीव सर्वांमध्ये निर्माण व्हावी ही जबाबदारी प्रत्येक भारतीयांची तसेच शासन -प्रशासन प्रतिनिधींची मुख्य जबाबदारी आहे. यासाठी संविधान जनजागृती अभियान राबविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता असे मत खोब्रागडे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नियोजन संविधान मित्र, देवानंद रंगारी, परेश माने, सुनील खंडाले, सुशील जानराव, आनंद गवळी, प्रतीक गायकवाड, समाधान पोटभरे, विकि व्हनकटे, पृथ्वीराज चंदनशिवे आणि अविनाश कोरडे, राजू सोनावणे, शिंदे या संयोजक समूहाने पार पाडले.

Post a Comment

0 Comments