Latest News

6/recent/ticker-posts

PATM फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सरफराज(बाबा) मणियार तर उपाध्यक्षपदी के वाय पटवेकर यांची निवड

PATM फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सरफराज(बाबा) मणियार तर उपाध्यक्षपदी के वाय पटवेकर यांची निवड


बी डी उबाळे

लातूर: PATM पटवेकर, अत्तार, तांबोळी, मणियार फाउंडेशनची नोंदणीकृत स्थापना करण्यात आली असून, या फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सरफराज बाबा मणियार तर उपाध्यक्षपदी पत्रकार के वाय पटवेकर यांची निवड एकमताने करण्यात आली आहे.

समाजाचे समाज संघटन करून समाजाला आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सदर फाउंडेशनचे अध्यक्ष सरफराज मनियार यांनी सांगितले.

सहसचिवपदी- शादाब पटवेकर, कोषाध्यक्ष- हबीब मणियार, सदस्य पदी- ॲड. कलीम मणियार, जफरोदिन पटवेकर, गफार(अत्तार) सय्यद, फैयाज अत्तार यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे. या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments